tahsildar jyoti pawar
sakal
पाचोड - पैठण तालुक्यातील पाचोड सह अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नव्या जोमाने गोदावरी पात्र वाळु तस्कराकडून पोखरण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त 'दै. सकाळ'ने मंगळवारी (ता. ११) प्रकाशीत करताच पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार या आपल्या कर्मचाऱ्यासमवेत गोदावरी पात्रात उतरल्या व पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणासाठी वापरण्यात येणारे ड्रम, दोर जप्त करून त्याची होळी करून रस्त्यावर चर खोदून वाहनांस रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.