
कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या १९४ वॉर्डातून ४९५ सदस्य निवडून जाणार आहेत. विधानसभा किंवा इतर निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत जास्त चुरस पहावयास मिळते.
कळंब (उस्मानाबाद) : जुलै ते डिसेंबरपर्यत मुदत संपलेल्या तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मोर्चेबांधणीला वेग आला असून आता ग्रामीण भागात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतच्या १९४ वॉर्डातून ४९५ सदस्य निवडून जाणार आहेत. विधानसभा किंवा इतर निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत जास्त चुरस पहावयास मिळते. तहसीलदार यांनी ५९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून निवडणुकीचा प्रश्न कसा हाताळायचा याबाबत गुरुवारी (ता.१७) बैठक घेऊन प्रशिक्षण देण्यात आले.
हे ही वाचा : पोलिसाच्या हुशारीमुळे तीन दुकाने व घर फोडण्याचा प्रयत्न फसला
कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे शासनाने प्रशासकाच्या नियुक्त्या करून ग्रामपंचायतचा कारभार पुढे ढकलला. त्यातच मागील १५ दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून १५ जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. १८ डिसेंबरला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार होते, परंतु मतदान संपल्यानंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने आधी 'लग्न पुन्हा साखर पुडा'अशी आरक्षण बाबत परिस्थिती निर्माण झाल्याने आखाड्यात उतरलेल्या इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे. निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतवर वर्चस्व ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्यामध्ये चढाओढ सुरू होणार आहे. काही ग्रामपंचायतवर भाजप गट- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेची सत्ता आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मोर्चेबांधणीला वेग
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत किती पँनल आखाड्यात उतरतील याची चाचपणी सध्या सुरू असून त्यावरच तोडीस तोड उमेदवार देण्याची रणनीती अवलंबिली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आजपर्यत एकमेकांचं तोंड न बघितलेले स्थानिक कार्यकर्ते, नेते ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र बसणार आहेत.
निवडणुकीत, पँनलमध्ये गंजलेल्या तोफा बाद
गावातील गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणत पहावयास मिळत आहे. राजकीय हेवेदाव्यामुळे अनेकांची मने दुखावली जातात. त्यामुळे ये आता मत मागायला असे मतदार बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात अथवा पँनलमध्ये आशा गंजलेल्या तोफांना थारा नसणार आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले