पोलिसाच्या हुशारीमुळे तीन दुकाने व घर फोडण्याचा प्रयत्न फसला

Thieves have foiled an attempt to break into three shops and a house in Jalkot due to the cleverness of the police
Thieves have foiled an attempt to break into three shops and a house in Jalkot due to the cleverness of the police

जळकोट (लातूर) : शहरात मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी तीन दुकाने व एक घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसाची रात्रीची  गस्त असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी राञी अडीचच्या सुमारास शहरातील जुन्या पोलिस चौकीच्या समोरील एक कपड्याचे, एक बाकड्याचे व एक लग्न सोहळ्याच्या टेटचे दुकानाचे अज्ञात चोरटयांनी कुलूप तोडून दुकान व घरातील चोरी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, जळकोट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दोन पोलिस जमादार व चालक राञी दहा ते पहाटे चार वाजेपर्यत शहरात गस्त घालतात. मंगळवारी दररोजच्याप्रमाणे बसवेश्वर चौक ते विठ्ठल मंदिर या रस्तावर राञीच्या सुमारास गस्त घालत होते. राञी अडीचच्या सुमारास पोलिस जमादार व चालक हे गस्त घालत असताना अज्ञात इसम पोलिस चौकी परिसरात फिरताना दिसून येत होते. जमादार यांनी श्री.चिमणदरे यांना या लोकांवर संशय आल्याने पुढे हॉर्न वाजत गेले. आणि पुन्हा त्या रस्तावरुन पोलिस वाहन हळूहळू चालवत जात होते.

त्यामुळे अज्ञात चोरट्यांना आपणास पोलिस ताब्यात घेण्यासाठी सापळा रचत असल्याचा संशय आल्याने सर्वांनी पळ काढला. परंतु दुकाने व घराचे कुलूप तोडलेले हे पोलिसांच्या लक्षात आले नव्हते. बुधवारी दुकाने व घराचे कुलूप तोडल्यावर मालकांना समजले असता त्यांनी दुकाने व घराचे दरवाजे काढून पाहणी केले. परंतु काहीही गेले नसल्याचे निर्दशनास आल्याने निश्वास सोडला. सकाळी दुकाने व घराचे कुलूप ठोकल्याचे लक्षात आल्याने सदरील दुकाने व घराच्या मालकांने घटनेची माहिती पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांना दिली.

पोलिस जमादार व चालक यांच्या हुशारीमुळे लाखो रुपयांची होणारी चोरी वाचल्याने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पोलिसाची राखीची गस्त किती महत्वाची आहे. हे या घटनेवरुन दिसून येते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com