कोरोनाशी लढा : बीडमध्ये दहा कोरोनामुक्त, एक नवा रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

  • जिल्ह्यात सध्या केवळ १२ रुग्ण 
  • आतापर्यंत ५३ कोरोनामुक्त 
  • नवीन आढळलेला रुग्णही मुंबई रिटर्नच 
  • आतापर्यंत आढळले ६६ रुग्ण, एकाचा मृत्यू 

बीड - मागच्या पंधरवड्यात सुसाट असलेले कोरोनामीटर आता काहीसे थंडावले आहे. शुक्रवारी (ता. पाच) मुंबईहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची बाधा असल्याचे तपासणीतून समोर आले. याचवेळी दहाजणांना कोरोनामुक्त करून घरी सोडण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेले ६६ जण आढळून आले असून संपर्कातील एक वगळता सर्व मुंबईहूनच आलेले आहेत. शुक्रवारी आढळलेला आंबेवडगाव (ता. धारूर) येथील कोरोनाग्रस्तदेखील मुंबई रिटर्नच आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ५३ जण कोरोनामुक्त झाले असून सहा जणांवर पुण्यात उपचार झाले. तर, उर्वरित ४७ जणांवर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय, केज व परळी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटर तसेच माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार झाले. आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने मी फाशी घेत आहे

पुन्हा दहा कोरोनामुक्त 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेणारे आठ व परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दोन अशा दहाजणांना शुक्रवारी कोरोनामुक्तीनंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये बीड शहरातील पाचजणांसह शिरूर कासार तालुक्यातील दोन व परळी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

शुक्रवारी एकाची भर 
शुक्रवारी जिल्ह्यातून लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या ३० थ्रोट स्वॅबपैकी २९ स्वॅबचे अहवाल निगेटीटिव्ह आले. तर, आंबेवडगाव (ता. धारूर) येथील मुंबईहून आलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत आढळलेल्या ६६ पैकी एकाचा मृत्यू व ५३ रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर जिल्ह्यात आता १२ रुग्ण उपचार घेत आहेत. यात जिल्हा रुग्णालयात ११ तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नवीन एक रुग्ण आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten corona-free, one new patient in Beed

फोटो गॅलरी