BreakingNews: मी कोरोनाच्या भितीने फाशी घेत आहे...वृद्धाने चिठ्ठी लिहली...

सुधीर एकबोटे
Thursday, 4 June 2020

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून कोरोनाची भीती कमी होत असतानाच एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. चार) तालुक्यातील मंगेवाडी येथे घडली. आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) असे गळफास लाऊन आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केला आहे.

पाटोदा (जि. बीड): दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून कोरोनाची भीती कमी होत असतानाच एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. चार) तालुक्यातील मंगेवाडी येथे घडली. आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) असे गळफास लाऊन आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केला आहे.

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

आसाराम पोटे हे कसल्याही प्रकारची आजारी नव्हते. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसात कोठेही प्रवास केलेला नव्हता वा कोणा नवीन व्यक्तीच्याही ते संपर्कात आले नव्हते. केवळ कोरोना विषयी बाहेर चर्चा ऐकून व सद्य परिस्थिती पाहून त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपली जीवनयात्रा संपवली. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली. सदर सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे,

हेही वाचा- वीजेचा शॉक लागून २६ मेंढ्यांचा मृत्यू 

यामध्ये कोणाचाही दोष नाही' असे त्यांनी या चिठ्ठीत लिहले आहे. त्यामुळे केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे या सर्व प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटने विषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा डोके हे करत आहेत.

घडलेली घटना ही नक्कीच धक्कादायक आहे. कोरोना या आजाराला न घाबरता केवळ स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. जरी एखादया व्यक्तीला हा आजार झाला तरी तो व्यक्ती ठणठणीत बरा होऊ शकतो हे मागील काही दिवसापूर्वी बरे झालेल्या रुग्णांवरून स्पष्ट झाले आहे.
-डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixty Five Years Old Age Person Sucide Beed News