Corona Update : जालना जिल्ह्यातील दहा जण कोरोनामुक्त, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

उमेश वाघमारे
Friday, 11 December 2020

जालना  जिल्ह्यात कोरोनामुळे एका बाधिताना गुरुवारी (ता.दहा) मृत्यू झाला, त्यामुळे आतापर्यंत ३३० रुग्ण कोरोनामुळे दगावलेले आहेत.

जालना : जिल्ह्यात कोरोनामुळे एका बाधिताना गुरुवारी (ता.दहा) मृत्यू झाला, त्यामुळे आतापर्यंत ३३० रुग्ण कोरोनामुळे दगावलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नवीन सहा जण कोरोनाबाधित आढळले. तर उपचारानंतर दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये गुरुवारी सहा जण कोरोनाबाधित आढळले. यात जालना शहरातील २, मंठा शहरातील २, जाफराबाद शहर आणि कुंभारझरी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील १० रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १२ हजार ६८८ झाला आहे, त्यांपैकी ११ हजार ९८८ जण उपचारानंतर बरे झाले. जिल्ह्यात सद्यःस्थितीमध्ये ३७० जणांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना रुग्ण आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ६८८
एकूण कोरोनामुक्त ः ११ हजार ९८८
एकूण मृत्यू ः ३३०
उपचार सुरू ः ३७०
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Covid Patient Cured In Jalna District