तेरणा सहकारी साखर कारखाना अखेर भैरवनाथ शुगर्सकडे भाडेतत्वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना

तेरणा सहकारी साखर कारखाना अखेर भैरवनाथ शुगर्सकडे भाडेतत्वावर

उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना अखेर भैरवनाथ शुगर्सकडे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन वेळा निविदा प्रसिध्द केल्यानंतर शेवटी आलेल्या एकमेव भैरवनाथ शुगर्सनी निविदा जमा केली होती. त्यांनाच याचा ताबा देखील मिळणार असुन अत्यंत महत्वाच्या कारखान्याची मालकी आता भैरवनाथ शुगर्सकडे असणार आहे.

तेरणा शेतकरी सहकारी कारखाना अवसायनात निघाला असुन पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्प यामध्ये अंतर्भुत आहे.यामध्ये भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे,यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये,तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये भाडे स्विकारले जाणार आहे.शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासुन करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे. डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एकरुपये दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासुन चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये,दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासुन तीन रुपये आकारले जाणार आहे.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासुन करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत.या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे.मालमत्ता जशी आहे आणि जिथे आहे,ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत अशा अटीवर व ज्यास कोणतीही हमी,खात्री,बंधन,जबाबदारी वा प्रतिनिधीत्वा शिवाय असलेल्या तत्वावर भाड्याने देण्यात येणार आहे.निविदेतील भाडे ठरलेल्या रक्कमेपेक्षा अधिक असावी असे निविदेत सांगितले होते. साहजिकच त्यानुसार भैरवनाथ शुगर्सकडे त्याची मालकी देण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे कारखान्यावर 127 कोटी 31 लाख इतके मुद्दल आहे,त्या कर्जावरील व्याजाची रक्कम 185 कोटी 15 लाख रुपये आहे.एकुण 312 कोटी 46 लाख रुपयाचे कर्ज कारखान्यावर आहे.

कारखाना चालु होणार

कारखाना आता या हंगामात चालु होणार का ?असा प्रश्न उपस्थित होत असुन एवढ्या अडचणीच्या काळात हा कारखाना भाडेतत्वावर गेल्याने आता शेतकऱ्यांची अपेक्षा यावेळी कारखाना सूरु होणे आवश्यक आहे.2012 पासुन हा कारखाना बंद होता तो कधी सूरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.

loading image
go to top