Beed Connection In TET Paper Leak Case Prakash Misal From Shirur Arrested Total Accused Number Reaches 18
esakal
बीड : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या २०२६ च्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात आता थेट बीड कनेक्शन समोर आले असून, नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत बीड जिल्ह्यातील शिरूर येथील प्रकाश मिसाळ यास रविवारी मुसक्या आवळल्या आहेत. या हाय-प्रोफाइल प्रकरणात आतापर्यंत तब्बल १८ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.