राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत ठाणे अव्वल

शिवचरण वावळे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

नांदेड शहरात  राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांच्याहस्ते राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या ठाणे गटास प्रमथ पारितोषिक देण्यात आले

नांदेड : महाराष्‍ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतुने दरवर्षी विविध सांस्कृतीक व लोकनृत्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा नांदेड शहरात ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नृत्य स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांच्याहस्ते राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या ठाणे गटास प्रमथ पारितोषिक देण्यात आले. 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. २३) लेबर कॉलनी येथील ललित कला भवनात राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे तोंडभरुन कौतुक करताना कामगार भारतीय संस्कृतीची जपणूक करत असल्याने सर्वांना अभिवान वाटला हवा असे त्या म्हणाल्या. 

हेही वाचा- विभागीय आयुक्तांनी घेतला अधिकाऱ्यांचा वर्ग

या जिल्ह्यातील स्पर्धकांचा सहभाग-
महाराष्ट्र कामदार मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत नांदेड, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, आमरावती, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर (दोन), अंधेरी, चंद्रपूर, नायगाव (मुंबई) या जिल्ह्यांतील १३ संघांनी स्पर्धेत सहभाग घेत शेतकरी, आदिवासी, धनगरी, कोळी, वाघ्या मुरळी अशा विविध नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

हेही वाचलेच पाहिजे- स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत या संघाने केली बक्षिसांची लयलुट-
या वेळी गट कार्यालय ठाणे यांनी प्रथम तर, गट कार्यालय नागपूर यांनी द्वितीय, तर नायगाव (मुंबई) गट कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. वरळीच्या गट कार्यालयास प्रथम उत्तेजणार्थ आणि अंधेरी (मुंबईच्या) संघास उत्तेजणार्थ द्वितीय बक्षीस देण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार, कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या शिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक, क्रीडा, प्रबोधनात्मक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात उपक्रमांचा भाग म्हणून महाराष्ट्रातील लोकपरंपरा व सांस्कृतिक जागर करण्यासाठी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रमुख अतिथी

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीक्षा धबाले, संध्या कल्याणकर यांच्यासह कामगार कल्याण मंडळाचे माजी सदस्य शिवाजी धर्माधिकारी, कामगार कल्याणचे सहआयुक्त डॉ. घनश्याम कुळमेथे, औरंगाबाद कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त मनोज पाटील, नांदेड विभागाचे कामदार कल्याण अधिकारी प्रसाद धस व लातूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane tops in state level dance competition