

Highway Horror: Thar Jeep Flips Multiple Times After Collision Near Kannad Factory Line
Sakal
कन्नड : धुळे-सोलापूर महामार्गावर शहराजवळ असलेल्या भारत पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (ता. ३०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास थार जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चेंबूर (मुंबई) येथील एकाच कुटुंबातील तिघांसह दुचाकीवरील दोन तरुण असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा हा सर्व थरार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.