खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ !  

खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ !  
Summary

खताच्या प्रत्येक पोत्यामागे झालेली मोठी वाढ पाहता ही खते विक्री करिता उचल करावी किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत व्यापारीवर्ग सापडला आहे.

कळमनुरी (हिंगोली) : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची (farmers) लगबग सुरू असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे खत (fertilizer) विक्रेत्या प्रमाणे शेतकरी (farmers) वर्ग संभ्रमात सापडला असून पुढील काळात किमती स्थिर असलेल्या सुपर फास्फेट, युरिया व पोटॅश या खतांच्या वापरामध्ये शेतकऱ्यांकडून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (The exorbitant increase in the price of fertilizer has confused the farmers like the fertilizer sellers)

आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाकडून शेतीची मशागत व इतर कामे करण्यासाठी लगबग चालविली असतानाच खरीप हंगामातील सोयाबीन कापूस, ऊस, हळद या पिकासाठी लागणाऱ्या व शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या प्रचलित खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे, ही वाढ करताना केमिकलच्या किमतीमध्ये झालेली भाव वाढ व इतर तांत्रिक प्रकारामुळे खताच्या  किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. खताच्या प्रत्येक पोत्यामागे सहाशे ते चारशे रुपये वाढ करण्यात आली आहे.

खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ !  
हिंगोली जिल्ह्यातील रस्ते होणार चकाचक; २३ कोटी ३९ लाखांच्या निधीला मंजूरी

त्याचा मोठा परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खताच्या प्रत्येक पोत्यामागे झालेली मोठी वाढ पाहता ही खते विक्री करिता उचल करावी किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीत व्यापारीवर्ग सापडला आहे. शेतकऱ्यांमध्ये वापरासाठी प्रचलित असलेल्या खताच्या किमतीमध्ये पूर्वीचे दर व आता करण्यात आलेली वाढ पुढील प्रमाणे10:26:26-, पूर्वीचे दर 1175रु. वाढीव दर 1775रु, 12:32:16-, 1190रु पूर्वीचे दर,1800रु, वाढीव दर 20:20:0.-975रु पूर्वीचे दर,1375रु, वाढीव दर ,डीएपी-1185रु, पूर्वीचे व आता1900रु, याशिवाय आयपीएल महाधन व जी एस एफ सी(सरदार) या कंपनी अंतर्गत असलेल्या खताच्या किमतीमध्ये ही मोठी वाढ करण्यात आली आहे.

खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ !  
हिंगोली : अर्बन परिवाराकडून कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा

खताच्या किमतीमध्ये झालेली मोठी भाव वाढ पाहता शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या या प्रचलित वापराची खते विक्रीसाठी आणावी किंवा नाही या मनस्थितीत असलेल्या खत विक्रेत्या प्रमाणेच शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात सोयाबिन, कापूस व हळद पिकासाठी शेतकरी वर्गाकडून अल्प दर वाढ झालेल्या सुपर फास्फेट, युरिया, व पोटॅश, या खताचा वापर वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

खताच्या किमतीमध्ये खत कंपन्यांकडून मोठी दर वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना झेपेल किंवा नाही शंका आहे. उचल केलेल्या खताची विक्री होईल की नाही, या शंकेने शेतकऱ्या प्रमाणेच खत विक्रेतेही द्विधा मनस्थितीत सापडले आहेत.

- गोविंद मनियार, खत विक्रेता कळमनुरी

(The exorbitant increase in the price of fertilizer has confused the farmers like the fertilizer sellers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com