esakal | तिघाडीचे सरकार आपल्या कर्माने कोसळेल
sakal

बोलून बातमी शोधा

MARATHWADA

तिघाडीचे सरकार आपल्या कर्माने कोसळेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगलूर : तिघे नव्हे तर पाच जणही एकत्र येऊन आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही पुरून उरू, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुहूर्त सांगणार नाही पण तिघाडीचे हे सरकार लवकरच त्यांच्या कर्माने कोसळेल, असे भाकीतही त्यांनी केले.

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने विधानसभेच्या देगलूर पोटनिवडणुकीसाठी कालच उमेदवारी जाहीर केली आहे. येथे आज झालेल्या मेळाव्यात साबणे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील बोलत होते.

ते म्हणाले, की सरकार तुमचे, तुम्ही सरकारचे प्रमुख असूनही प्रत्येक जिल्ह्यात तुमच्या कार्यकर्त्यांची कोंडी होत असेल, तुम्ही गप्प राहणार असाल तर हळूहळू एकेक कार्यकर्ता दूर होणार नाही तर काय? सत्तेसाठी लाचारी तरी किती पत्करायची, हे ठरवण्याची वेळ आली असल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने साबणे भाजपमध्ये आले आहेत. आमच्याकडे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आचारसंहितेची आडकाठी होणार नाही, तरी त्यांना द्यायचेय कुठे, असा सवालही त्यांनी केला.

loading image
go to top