esakal | परभणीतील इनायतनगरचे लसीकरण केंद्र ठरतेय आदर्श; केंद्रात सर्व महिला कर्मचारी

बोलून बातमी शोधा

परभणी लसीकरण केंद्र
परभणीतील इनायतनगरचे लसीकरण केंद्र ठरतेय आदर्श; केंद्रात सर्व महिला कर्मचारी
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः येथील इनायत नगरमधील महापालिकेच्या रुग्णालयात ( Parbhani municipal corporation) सुरु करण्यात आलेले लसीकरण केंद्रावरील लसीकरणाचे नियोजन, शिस्तबध्दता यामुळे हे केंद्र आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर सर्व महिला कर्मचारीच (Lady employee) नियुक्त आहेत हे या केंद्राचे मुख्य वैशिष्ट आहे. The ideal immunization center at Inayatnagar in Parbhani; All female staff at the center

परभणी शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. शहरातील पश्चिम भागातील कॉलन्यासाठी इनायतनगरमधील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून दररोज शेकडो लोकांना लसीकरण केले जात आहे. या ठिकानी १० महापालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी तर १८ आशा सेविका कार्यरत आहेत. या आशा सेविकांच्या नियोजनबध्द कामामुळे हे सर्व शक्य झाले आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरीकांची गर्दी मोठी असली तरी आता पर्यंत कसलाही गोंधळ उडाला नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा - भविष्यात सीरम कंपनी युकेमध्येही लस तयार करू शकते, असंही पंतप्रधान जॉन्सन यावेळी म्हणाले.

उपजिल्हाधिकारी डॉ. कुंडेटकरांकडून पाहणी

इनायतनगरच्या लसीकरण केंद्राची मंगळवारी (ता. चार) उप विभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रावरील नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व महिला कर्मचारी असतांनाही कुठेही नियोजन ढेपाळले नाही याचे त्यांनी कौतूकही केले. त्यांच्याकडून या केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी चहाची मशिन व वाफ घेण्याचे यंत्र ही भेट म्हणून दिले आहे.

अशी आहेत महिला कर्मचाऱ्यांची नावे

डॉ. नाहेदा फातेमा, शेख मारिया, स्नेहा लांडगे, शितल मानवतकर, जे. आर. ठाकूर, पी. आर. गुऊळकर, आर. एम. मुराडी, मनिषा सुर्यवंशी, अंजना दुभाळकर, प्रशांत कुलकर्णी, विद्या नगरसाळे, सुशिला सरकटे, पुजा पवार, अनिता गव्हाणे, संजिवनी सातपुते, राधा मरडे, अनिता बोराडे, ज्योती दंडे, उषा राऊत, माधूरी सूर्यवंशी, गीता घटे, अश्विनी डांगे, सुवर्णमाला ताकतोडे, वर्षा कंधारे, स्वाती जाधव, आसमा खान, संगिता लव्हंडे, गोकर्णा साबरे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

https://www.youtube.com/watch?v=eTfPn1xHlkI