esakal | अदर पूनावालांची युकेमध्ये २४० मिलियन पौंडची गुंतवणूक

बोलून बातमी शोधा

adar poonawalla

सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. तसेच कोरोना व्हायरसविरुद्धच्या सर्वात स्वस्त अॅस्ट्राजेनका लस बनविण्यात आघाडीवर राहिली आहे.

अदर पूनावालांची युकेमध्ये २४० मिलियन पौंडची गुंतवणूक
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता युनायटेड किंग्डममध्ये (United Kingdom) मोठी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी सोमवारी (ता.३) याबाबतची माहिती दिली. भविष्यात सीरम कंपनी (Serum Institute of India) युकेमध्येही लस तयार करू शकते, असंही जॉन्सन यावेळी म्हणाले. सीरम कंपनी २४० मिलियन ब्रिटिश पौंड म्हणजे ३३४ मिलियन डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करेल, ज्यामध्ये क्लिनिकल ट्रायल, संशोधन, विकास आणि लस निर्मिती केली जाईल. (Adar Poonawallas Serum Institute to invest 240 million pounds in UK)

हेही वाचा: बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय

सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. तसेच कोरोना व्हायरसविरुद्धच्या सर्वात स्वस्त अॅस्ट्राजेनका लस बनविण्यात आघाडीवर राहिली आहे. ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, भारताशी १ अब्ज डॉलर्स व्यापार आणि गुंतवणूक कराराचा हा एक भाग आहे. ज्यामुळे ६ हजार ५०० जणांसाठी रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. दरम्यान, मंगळवारीच जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांच्या व्हर्चुअल बैठक होणार आहे, या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'

गेल्या वर्षी युरोपियन युनियनपासून विभक्त झाल्यापासून ब्रिटन गुंतवणूक आणि व्यापारासाठी भारताला प्राधान्य देत आहे. वर्षाच्या सुरवातीला बोरिस जॉन्सन भारत दौर्‍यावर येणार होते, पण सतत वाढणाऱ्या कोरोना केसेसमुळे त्यांचे दौरे पुढे ढकलण्यात आले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधीपासून भारत अॅस्ट्राजेनका वॅक्सिन आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांमध्ये निर्यात करत होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे गेल्या महिन्यात त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.