Nilanga News : ‘कमळ’ हाच उमेदवार; अरविंद पाटील निलंगेकरांचा पक्षनिष्ठेचा आदर्श

युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी पुन्हा एकदा पक्षनिष्ठेचा आदर्श घालून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Arvind Patil Nilangekar

Arvind Patil Nilangekar

sakal

Updated on

निलंगा - लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद उभी करण्यात ज्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, त्या युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी पुन्हा एकदा पक्षनिष्ठेचा आदर्श घालून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असताना पक्षाने अन्य उमेदवाराला संधी दिली. मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त न करता त्यांनी पक्षाच्या आदेशाला शिरोधार्य मानून पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com