औरंगाबादमध्ये पुन्हा अवतरले सोनसाखळी चोर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शहरात पुन्हा सोनसाखळी चोर अवतरले आहेत. सिडको एन-पाच येथून पायी जाणाऱ्या महिलेचे 75 हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (ता. तीन) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे महिलेने सिडको पोलिसांना सांगितले. 

औरंगाबाद - शहरात पुन्हा सोनसाखळी चोर अवतरले आहेत. सिडको एन-पाच येथून पायी जाणाऱ्या महिलेचे 75 हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी (ता. तीन) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे महिलेने सिडको पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संध्या सुभाष रापतवार (वय 60, रा. जे सेक्‍टर, विजयश्री कॉलनी, एन-5, सिडको) या घराजवळ उभ्या असताना दोन अज्ञान दुचाकीवर बसून आले. त्यांनी दुचाकी हळू करीत महिलेच्या पाठीमागून मणी-मंगळसूत्र ओढून तोडले. 

मंगळसूत्र तुटून हातात येताच चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. घटना घडताच महिलेने सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of mangalsutra at Aurangabad