esakal | चोरट्यांनी पळवले चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेतील टीव्ही
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb

फळ्याला लावण्यात आलेली व बॉक्समध्ये असलेल्या ८ एलईडी चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे

चोरट्यांनी पळवले चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेतील टीव्ही

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): तालुक्यातील इटकुर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील अडीच लाख रुपये किमतीच्या ८ एलईडी टिव्ही संच चोरट्याने पळविल्याची घटना सोमवार (ता.६) सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यामुळे मात्र परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिस बिट अंमलदार बाळासाहेब तांबडे, जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

तालुक्यातील इटकुर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, यासाठी शिक्षक सहकारी पतसंस्था, शिक्षक, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून व ग्रामपंचायतच्या पुढाकारातून 12 टीव्ही संच बसविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना टीव्ही संचद्वारे ज्ञानाचे धडे देण्यात आले. कोरोना संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थिती प्रमाणे दररोज शिक्षक शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार उपस्थिती लावत आहे. अज्ञात चोरट्याने रविवारी रात्रीच्या वेळी पाऊस असल्याने याचा फायदा घेत चोरट्याने सुरवातीला शाळेच्या कार्यलयाच्या कुलपचा कोंडा एकसाब्लेडने कापले. आत प्रवेश करून कार्यलयाचे कुलूप तोडले. फळ्याला लावण्यात आलेली व बॉक्समध्ये असलेल्या ८ एलईडी चोरट्याने पळविल्याची घटना सोमवारी शाळेच्या शिक्षकांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली बाजू

शाळेतून शैक्षणिक साहित्य चोरट्याने पळविल्याने चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी ग्रामपंचायत, शिक्षक सहकारी संस्था व लोकसहभागातून टीव्ही संच शाळेला देण्यात आले होते. इटकुर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत चोरी झाल्याने आता परिसरातील इतर शाळेच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून शाळेत चोरी झाल्याची माहिती मिळताच उपसरपंच विलास गाडे, गुंडेराव गंभीरे, हनुमंत कसपटे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर बावळे, श्रीकांत सावंत,रविकांत गवारे आदींनी भेट देऊन पाहणी केली.

loading image
go to top