Loksabha 2019 : मतदारांच्या भर उन्हात रांगा, सावलीची सोय नाही, कर्मचारीही घामाघुम

अनिल कुमार जमधडे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. दुपारी अकरा वाजेपर्यंत सरासरी 18 ते 22 टक्‍क्‍यांच्या दरम्यान मतदान झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मतदार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

सिडको परिसरातील आंबेडकर नगर या अती संवेदनशील मतदान केंद्रावर अंधार्‍या कोंदट पत्र्याच्या खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पंखा नसल्याने उकाड्यामुळे मतदान कर्मचारी हतबल झाले आहेत. केंद्राच्या बाहेर पेंडॉल टाकलेला नसल्यामुळे मतदारांना उन्हात रांगा लावाव्या लागल्या आहेत. 

आंबेडकर नगर हे अती संवेदनशील मतदान केंद्र असल्याने सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Web Title: There is no facility of shade or fan for voters in aurangabad