‘या’ शहरात सुरक्षीत अंतराची पायमल्ली!

file photo
file photo

पाथरी(जि.परभणी) : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूसाठी मुभा दिली गेली असली तरी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात चक्क बाजार भरला जात असून यामुळे सुरक्षीत अंतराची (सोशल डिस्टेंशन) अक्षरशः पायमल्ली होत आहे, पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे गरजेचे झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी सात ते अकरा असे चार तास दिले आहेत.  प्रशासनाने भाजीपाला विक्रीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात व्यवस्था केली असून या ठिकाणी दररोज सकाळी अक्षरशः बाजार भरत आहे. कोरोना संदर्भात कोणतेही नियम पाळले जात नाहीत. बाजारात येणाऱ्या ग्राहकांनीच काय तर एकही व्यापारी मास्क लावत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सुरक्षीत अंतराची अक्षरशः पायमल्ली होत आहे. पोलिसांनी आता कठोर भूमिका घेणे गरजेचे झाले आहे.

जनजागृतीची आवश्यकता
शहरातील अनेक भागात संचारबंदी नावालाच असल्याचे दिसत असून कोरोना सारख्या आजाराला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक सुरक्षीत अंतर ठेवून व्यवहार केला पाहिजे. परंतू, पाथरीकरमध्ये याबाबत अज्ञान असल्याचे त्यांच्या बाहेर फिरण्या व बसण्यावरून दिसून येते. त्यांच्यात जनजागृतीची आवश्यकता आहे.

हेही वाचा ....

 जिंतूरला बाजारपेठेत गर्दी झाली विरळ


जिंतूर (जि.परभणी) :  भाजीमार्केट, किराणा तथा अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी, रस्त्यावर दिसणारी बेशिस्त गर्दी विरळ झालेली दिसत असून सर्वजन सुरक्षीत अंतराच्या (सोशल डिस्टेंशन)  नियमाचे पालन करत असल्याचे चित्र शुक्रवार (ता.तीन) पासून शहरात दिसत आहे. त्यामुळे पोलिस, महसूल, नगरपरिषद प्रशासन यांनी समन्वयाने कलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले म्हणावे लागेल.

कोरोना या संसर्गजन्य आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाउन जाहीर केला. लोकांनी रस्त्यावरची बाजारातील गर्दी टाळून घरीच थांबावे यासाठी जमाव बंदी, संचारबंदी लागू केली. त्यानुषंगाने जिल्हा, स्थानिक प्रशासनाने वारंवार नागरिकांना आवाहन केले.
सोशल डिस्टेंशन पाळण्यासाठी भाजी विक्रेते, किराणा व औषधी दुकानांवर मार्किंग केली. भाजी मंडई तीन ठिकाणी भरण्यात आली.
तरी, लोकांना त्याचे गांभीर्य जाणवले नाही. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही रस्त्यावर उतरून गर्दी टाळून घरीच थांबण्याचे आवाहन केले. त्यानंतर तहसीलदार सुरेश शेजूळ, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक कपिल फारुकी यांच्या समन्वयातून यासंदर्भात पार पडलेल्या बैकीनुसार पोलिसांनी कडक धोरण अवलंबून नगरपरिषदेच्या सहकार्याने ठिकठिकाणी नव्याने मार्किगची आणखी केली. ग्राहक व विक्रेते यांच्यात अंतराची सीमारेषा निश्र्चित केली. 
मास्क वापरण्याचे सर्वांना बंधनकारक केले. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात केला. 

वाहनधारकांवर कारवाईचा बडगा
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. परजिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्यांना चेकपोस्टच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात सकाळी चार तास भाजी मार्केट, किराणा दुकान सुरू ठेवण्या येतात.
तेथे पूर्वीप्रमाणे गर्दी दिसली नाही. साडे अकरा नंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. यावरून या सर्व बाबींचा परिणाम झाल्याचे चित्र शुक्रवारी, शनिवारी शहरात दिसले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com