Thergaon Paithan Accident Santosh Ahire : दिवाळीच्या पूर्वसंध्येला काळाचा घाला; थेरगाव येथे भरधाव दुचाकी घराच्या भिंतीवर धडकल्याने ४५ वर्षीय कुटुंब प्रमुख जागीच ठार

Heartbreaking Incident Near Home : घरापासून अवघ्या ५० फुटांवर असताना ओढवलेला काळाचा प्रसंग; संतोष उर्फ बाळू अहिरे यांच्या निधनाने थेरगावात दिवाळीच्या तोंडावर पसरली शोककळा
Head of family dies as speeding two-wheeler crashes into house wall.

Head of family dies as speeding two-wheeler crashes into house wall.

Sakal

Updated on: 

पाचोड : दिवाळीच्या आनंदोत्सवाची लगबग सुरू असतानाच थेरगाव (ता.पैठण) येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला काळाने एका कुटुंब प्रमुखावर घाला घातला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगत असलेल्या घराच्या भिंतीवर धडकून झालेल्या या भीषण अपघातात ४५ वर्षीय संतोष उर्फ बाळू यौव्हाण अहिरे यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास थेरगाव-वडजी रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौकात घडली. दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण थेरगावात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...