

Sudden Fire in Thergaon Destroys Four Acres of Sugarcane
Sakal
पाचोड : अचानक शेतातील तोडणीला आलेल्या उसाच्या फडाला आग लागून चार एकरावरील उस जळून दोघां शेतकऱ्या भावंडाची लाखोंची नुकसान झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.२३) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.