esakal | परळीतील विद्युतनिर्मिती बंद असल्याने बेरोजगारी वाढली, वापराविना कोळसाही होतोय खराब
sakal

बोलून बातमी शोधा

Thermal Power Centre

परळी वैजनाथ येथे औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचांतून ७५० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.

परळीतील विद्युतनिर्मिती बंद असल्याने बेरोजगारी वाढली, वापराविना कोळसाही होतोय खराब

sakal_logo
By
प्रविण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथे औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचांतून ७५० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे शहर व परिसरातील अनेक नागरिकांना छोटा मोठा रोजगार मिळतो. मात्र मागील सहा- सात महिन्यांपासून केंद्र बंद असल्याने बेरोजगारी निर्माण झाली आहे. शहरात महा औष्णिक विद्युत केंद्रे आहेत.

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, आरक्षण स्थगितीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा...

सुरवातीला या महानिर्मिती केंद्रातून ११०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात होती. यातील दोन विद्युतनिर्मिती संचांची मुदत संपल्याने ते भंगारात काढण्यात आले आहेत. उर्वरित तीन संच हे २५० मेगावॅट क्षमतेचे आहेत. या तीन संचांतून ७५० मेगावॅट विद्युतनिर्मिती केली जाते. या संचांना सुरवातीपासूनच ग्रहण लागले आहे. येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रास कधी पाणी कमी पडते, कधी, कोळसा नसतो. दोन्ही उपलब्ध असेल तर या संचातून निर्माण होणारी वीज महाग पडते म्हणून विद्युतनिर्मिती बंद केली जाते.

शासनाने करोडो रुपये खर्च करून औष्णिक विद्युतनिर्मिती संच बांधून तयार केले, तर कमीत कमी तयार केलेला खर्च निघेपर्यंत तरी हे संच व्यवस्थित चालले पाहिजेत. राज्यात अनेक ठिकाणी विद्युतनिर्मिती संच आहेत. त्यांच्या मानाने परळीच्या संचातून तयार होणारीच वीज महाग का, असा प्रश्‍न आहे.

मराठा आरक्षणासाठी छावाचे ‘ढोल बजाओ’,सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन

येथील विद्युतनिर्मिती संच जर सातत्याने बंद करावे लागत असल्याने यावर अवलंबून असलेले सुशिक्षित बेरोजगार, कंत्राटदार यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तिन्ही संचांच्या ठिकाणी काम करणारे जवळपास १ हजारावर कामगार बेरोजगार झाले आहेत. २ एप्रिलपासून संच अद्यापही बंदच आहेत. जवळपास सहा महिने झाले आहेत. वापराविना कोळसाही खराब होत आहे. अगोदर कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. त्यात हे महाविद्युत निर्मिती केंद्र बंद असल्याने शहर व परिसरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.

खर्च कमी करण्याची गरज
संच क्रमांक आठ हा नवीनच आहे. तो शासनाकडे हस्तांतरित केलेला नाही. मग या केंद्राचा खर्च जास्त कसा? असा प्रश्‍न आहे. संच क्रमांक आठ हा अनेक वेळा ऑइलवर सुरू केला जातो. कोळशापेक्षा ऑइलचा खर्च जास्त आहे. तसेच याची देखभाल व दुरुस्ती इतर संचाच्या खर्चात दाखवला जात असल्याचीही चर्चा आहे. हा खर्च कमी करून येथील तिन्ही संच कसे कमी खर्चात चालले जातील, याची जबाबदारी केंद्राच्या प्रशासनाने घेतली पाहिजे. पगार रखडल्याने कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांचा झळ बसते. कायम कर्मचाऱ्यांना नाही. याकडे शासनाने, तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Corona Update : औरंगाबादेत कोरोनाचे वाढले २३७ रुग्ण, आणखी ८७६ जण झाले बरे

संपादन - गणेश पिटेकर