‘या’ गाड्या बनताहेत मिनी वाईनबार

File photo
File photo

नांदेड : प्रत्येक शहरात रस्त्याच्या कड्याला अनेक खाद्य पदार्थांच्या गाड्यांची चांगलीच संख्या असते. त्या गाड्यांवर जावून नागरिक सुद्धा आपल्या जिभेचे चोचले पुर्ण करतात. अशाच गाड्यांमध्ये अनेक ठिकाणी अंडाभुर्जीच्या गाड्या सुद्धा लागतात. परंतु, या अंडाभुर्जी विक्रेत्यांकडून ग्राहकांना त्यांच्या दुकानाजवळ टाकण्यात आलेल्या बाकड्यांवर बसून खुलेआम मद्य पिण्याची मुभा देण्यात येते. त्यामुळे या अंडाभुर्जीच्या गाड्या दिवसेंदिवस अनधिकृतरित्या मिनी वाईनबारच होत असल्याचे चित्र शहरातून दिसत आहे.  

अधिकचे पैसे मिळविण्यासाठी अवैध धंदे
स्पर्धा तीव्र झालेल्या आहेत. त्याचबरोबर बेरोजगारीचेही प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे. उच्च शिक्षण घेवूनही नोकऱ्या मिळत नसल्याने अनेकांनी हातगाड्यांवर विविध धंदे करायला सुरुवात केली आहे. कोणी फळे विकतो, कोणी भाजीपाला, कोणी कपडे तर कोणी खाद्यपदार्थ विकतात. जास्तीचे पैसे कसे मिळतील याकडे त्यांचा सर्वाधिक लक्ष असल्याने, आपल्याकडून अवैध धंदे होत आहेत, याची पुसटशीही कल्पना त्यांना नसते. त्यातून अवैध धंदे दिवसेंदिवस भररस्त्यावर वाढताना दिसत आहे.

खुलेआम ढोसले जातेय मद्य
बेरोजगारांकडून आपणाला रोजगार मिळावा या हेतूने प्रत्येक शहरातील रस्त्याच्या कडेला टपऱ्या उभारून अथवा हातगाडी लावून विविध व्यवसायाद्वारे रोजगार मिळविण्याची धडपड सुरु असते. अशातच काही बेरोजगारांनी खाद्य पदार्थांबरोबरच अंडा भुर्जीच्या गाड्या सुद्धा लावलेल्या आहेत.  अंडाभुर्जी विक्री व्यवसायातून दोन पैसे मिळविणे हा त्यांचा उद्देश असतो. परंतु त्यांच्याकडे येणाऱ्या बऱ्याच ग्राहकांना त्यांच्याकडून मद्य पिण्याची मुभा खुल्या रस्त्यांवर दिली जाते. 

अंडाभुर्जीच्या गाड्यांना प्राधान्य 
बारमध्ये मद्य पिण्यास गेल्यावर त्याठिकाणी सर्व्हीस चार्ज बरोबरच मद्याची अधिक किंमत सुद्धा ग्राहकांना द्यावी लागते. थोडाफार पैसा वाचविण्यासाठी अशा मद्यपिंकडून वाईन शॉपमधून मद्य विकत घेवून ते सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या अशा काही अंडाभुर्जीच्या गाड्यांवर जातात. त्याठिकाणी मद्य पिण्याबरोबरच अंडाभुर्जी वाल्याकडून खाण्यासाठी काही तरी विकत घेतले जाते. आपल्यालाल दोन पैसे मिळतात यामुळेच तो विक्रेता त्या मद्यपिंना हटकत नाही. 

विक्रेत्याचा असाही डबल धंदा
मद्यपिंकडून मदीरा पोटात रिचवल्यानंतर सोबत आणलेली दारुची खाली बाटली तिथेच टाकली जाते. दररोज अशा शेकडो बाटल्या त्या अंडाभुर्जी विक्रेत्याकडे जमा होतात. त्याखाली बाटल्या विकून सुद्धा त्याला दोन पैसे मिळतात. त्यामुळेच तो ही अशा मद्यपींना हटकत नसावा. अंडाभुर्जीच्या ठेल्यांच्या आजू-बाजूला अनेक अन्य पदार्थांचे ठेले सुद्धा असतात. त्याठिकाणी अनेक जण सहकुटुंब येतात. या सर्व प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे साफ दूर्लक्ष आहे की दिसून न दिसल्यासारखे केल्या जाते हा ही एक प्रश्‍नच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com