बनावट पास घेऊन आले अन् क्वारंटाईन झाले

file photo
file photo
Updated on

पाथरी (जि.परभणी) : बनावट पास तयार करून खासगी वाहनाने पुण्याहून परभणीला येणाऱ्या एका कुटूंबाला पोलिस निरीक्षकाच्या सतर्कतेने रोखण्यात आले. ही घटना शुक्रवारी (ता. एक) ढालेगाव चेकपोस्टवर सकाळी घडली. या घटनेतील वाहन चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत प्रशासनाने सात जणांना क्वारंटाईन केले आहे.
लॉकडाउन हा काळ वाढत असताना आत्ता इतर ठिकाणी अडकलेल्याची घालमेल होत असून ते आता कोणत्याही परिस्थितीत घर जवळ करण्यासाठी काहीही करण्याच्या मानसिकतेवर आले आहेत. अशीच एक घटना ढालेगाव चेकपोस्ट वर उघडकीस आली आहे. रेड झोन असलेल्या पुणे येथून आसेफ युनुस शेख (रा. दर्गा रोड परभणी) हे जिल्हाधिकारी कार्यालयाची खोटी पास तयार करून आपल्या कुटूंबासह परभणीला ता. ३० एप्रिल रोजी रात्री पुण्याहून निघाले. दरम्यान, शुक्रवारी (ता.१) सकाळी १० वाजता परभणी जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या ढालेगाव चेकपोस्टवर आले. 

चौकशीतून आले समोर
यावेळी पोलिस निरीक्षक के. बी. बोधगिरे हे चेकपोस्ट चेकिंगसाठी ढालेगाव येथे गेले असता त्यांनी पुण्याहून आलेल्या आसेफ युनुस शेख यांची पास तपासली असता त्यांना सदर पासचा संशय आला. त्यांनी तात्काळ तहसीलदार यु. एन. कागणे यांना याबाबत माहिती दिली. तहसीलदार कागणे यांनी चेकपोस्ट गाठत पासची जिल्हाधिकारी कार्यालयाला विचारणा केली असता सदर पास आमच्या कार्यालयाकडून देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दम दिल्यानंतर सादर पासवर खाडाखोड केल्याचे आसेफ युनुस शेख यांनी सांगितले. रात्री उशिरा आसेफ युनुस शेख यांच्यावर नायब तहसीलदार संदीप साखरे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच प्रशासनाने या सर्व कुटुंबाची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले आहे.


सहा चेकपोस्टवरून सुटले कसे? 
पुण्याहून परभणीला येताना पुणे, अहमदनगर व बीड जिह्यातील प्रत्येकी दोन असे सहा चेकपोस्ट लागत असतांना ही खोटी पास तयार करून हे कुटुंब परभणी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आले असल्याने या कुटूंबाची मागील एकाही चेकपोस्टवर साधी चौकशी सुद्धा झाली नसल्याचे दिसत आहे. सहा चेकपोस्टवर सुटले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com