त्यांनी उभा केला नवीन संसार, आगीत जळाले होते घर

House Destroyed In Fire
House Destroyed In Fire

हेर (जि.लातूर) ः हेर (ता.उदगीर) येथील संतोष सोपान सुर्यवंशी यांचे घर जळुन खाक झाले आहे. त्यांना शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. परंतु हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ.संजय सांडोळकर  व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविका दैवशाला मुंडे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार तवंडे यांनी मिळून या गरीब कुटुंबाचा नवीन संसार उभा करून दिला आहे. यामध्ये वाघमारे यांनी संसारात लागणारी सर्व भांडी व नगदी दोन हजार रुपये व डॉ.सांडोळकर यांनी घरात लागणारा किराणा माल, तर सेविका मुंडे व तवंडे यांनी एक क्विंटल ज्वारी अशी मदत सुर्यवंशी कुटुंबीयांना केली आहे.  


ता.२७ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हेर परिसरात जोराचे वादळ सुटले होते. त्यात अचानक सुर्यवंशी यांच्या घराला आग लागुन अख्खे घर जळुन खाक झाले होते व अंगणात बांधलेली एक म्हैस आगीत दगावली होती. त्यामुळे सुर्यवंशी यांचा पुर्ण संसारच उघड्यावर आला आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. परंतु शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. सोमवारी (ता.३०) वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ. संजय सांडोळकर, दैवशाला मुंडे, राजकुमार तवंडे यांनी संतोष सुर्यवंशी यांना संसार उपयोगी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.  यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे, अविनाश सुर्यवंशी यांच्यासह सुर्यवंशी कुटुंबीय उपस्थित होते.  दरम्यान ही मदत सामाजिक बांधिलकी म्हणून  असुन याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवुन दिला आहे. पाठपुरावा चालु आहे व लवकरच  शासनाकडून मदत  मिळणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी दिली.  


कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खासदारांनी दिला एक कोटीचा निधी
वडवळ नागनाथ (जि.लातूर) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तसेच आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भाजपच्या खासदारांची एक समिती स्थापित करुन त्यांच्याकडून एक कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आदर करीत खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपत्कालीन स्थिती पाहता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी एक कोटी रुपयांचा निधी पत्राद्वारे त्यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
श्री.शृंगारे यांनी त्यांचे एक महिन्याचे एक लाख रूपयांचे वेतनही पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी जमा केला आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याच्या प्रतिबंधासाठी देशातून मदतीचा ओघ वाढत चालला आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी श्री.शृंगारे यांनी खासदार निधीतील एक कोटी रुपयाचा निधी दिला आहे. कोरोनाच्या थैमानाने जगभर मृत्यूचे तांडव निर्माण केले असून, देशातही कोरोना दिवसेंदिवस पाय पसरत आहे. सद्यःस्थितीत देशात नऊशेपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार तसेच देशाची आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे. देशात आणि राज्यात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्याचा संभाव्य धोका परतवून लावण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कोरोनाविरोधी लढ्यात खासदारांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आवश्यक औषधी, यंत्रसामुग्रीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपयाचा निधी आणि आपले एक महिन्याचे वेतन एक लाख रुपये पंतप्रधान साहाय्यता निधीसाठी दिले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com