Lohgaon Crime : चार मेंढपाळ कुटुंबावर मध्यरात्री चोरट्यांचा हल्ला; सात जण जखमी, दोन जण गंभीर जखमी

एका शेतात मुक्कामी थांबलेले बारामती तालुक्यातील चार मेंढपाळ कुटुंबावर चोरट्यांनी लाकडी दांडे, कुऱ्हाडीने सहा पुरूष दोन महिलांना जोरदार मारहाण केली.
Thieves Attack on Shepherd Family
Thieves Attack on Shepherd Familysakal
Updated on

- ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव - छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोहगाव शिवारात एका शेतात मुक्कामी थांबलेले बारामती तालुक्यातील चार मेंढपाळ कुटुंबावर गुरूवार (ता. ६) मध्यरात्री चोरट्यांनी लाकडी दांडे, कुऱ्हाडीने सहा पुरूष दोन महिलांना जोरदार मारहाण केली.

यात दोन जण गंभीर जखमी असुन सोने, चांदी, रोख रक्कम ओरबाडून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाणे व वरीष्ठ पोलीस अधिकारी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील मुढाळ गावातील चार मेंढपाळ कुटुंबे टाकळी पैठण येथुन लोहगाव ते दिन्नापूर रोडवरील अजय दसपुते यांच्या गट नंबर ५८ मधील शेतात गुरूवार (ता. ६) मेंढ्यांचा कळपासह थांबलेले होते.

त्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री चोरट्यांचे टोळीने एका बाजूचे तार कुंपण तोडून झोपलेल्या मेंढपाळावर अचानक लाकडी दांडे, कुराडीनी जोरदार मारहाण हल्ला करत महिला, लहान मुलांचे अंगावरील पाच ते सात तोळे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम ओरबाडून चोरटे पसार झाल्याची घटना घडली.

यात गुलाब टेगळे, अप्पासाहेब टेगळे, सोनबा हाके, सिताराम टेगळे, लक्ष्याबाई टेगळे, लिबाबाई टेगळे, जखमी तर हिरामण टेगळे, कांतीलाल टेगळे, हे गंभीर जखमींना छञपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती पहाटे गणेश इथापे, यांनी बिडकीन पोलिसांना देताच सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके, यांच्या पथकासह अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा नांगरे, सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनिल खरात, संतोष पाटील, गोपाल पाटील, विठ्ठल डोखे, संतोष डमाळ, संतोष तोडकर, सोमनाथ तांगडे, यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी, पंचनामा करून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहे.

तर मुक्का मर लागलेले भिमा टेगळे, आदींना स्थानिक दवाखान्यात उचार करण्यात आले. दरम्यान गंगापूर तालुक्यातील दोन शेत वस्ती दरोडा घटने पाठोपाठ हि घटना घडल्यामुळे शेत वस्तीवर राहणारे कुटुंबात खळखळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com