
जालना : जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन आणि जालना या पाच विधानसभा मतदारसंघांत वंचित, बसपासह तिसऱ्या परिवर्तन आघाडीची मोठी वाताहत पाहायला मिळाली. यात अपक्षासह अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. वंचित आघाडीने पाच, बसपाने चार, तर तिसऱ्या परिवर्तनमधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि स्वाभिमानी पक्षाने दोन ठिकाणी उमेदवार दिले होते.