esakal | जालना जिल्ह्यातील ३५ गावांतील शाळा कोरोना रूग्णसंख्येमुळे बंदच | Jalna
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

जालना जिल्ह्यातील ३५ गावांतील शाळा कोरोना रूग्णसंख्येमुळे बंदच

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : शासनाने ग्रामीणसह शहरी भागात शाळा सुरुवात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात (Jalna) एकीकडे नियोजन सुरु असताना ३५ गावांत कोरोना रूग्णसंख्या असल्याने तेथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास जिल्हा आरोग्य विभाग व शिक्षण विभागाने निर्बंध लावण्यात आले आहेत, हे विशेष. दीड वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. यातच कोरोना (Corona) परिस्थितीत विचार करता राज्यात शहरी भागात शाळा सुरुवात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ता.४ ऑक्टोबरपासून शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये (Schools Reopen) प्रत्यक्ष सुरुवात करण्याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांनुसार आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ३५ गावांत कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाल्याने तेथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरुवात करण्याबाबत निर्बंध ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा: औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिक्षण विभागाला सूचना देत गावांची यादी जाहीर केली आहे. जालना ग्रामीण भागात सामनगाव, मानेगाव, जामवाडी, सेवलीसह हस्तेपोखरी, नळणी, गुळखंड, विधोरा, ढोकसाळ, दहीगाव अशा ३५ गावांतील शाळांबाबत निर्बंध लावण्यात आले आहे. या गावातील शाळा एक महिन्यापर्यंत बंदच ठेवण्यात येतील असे शिक्षण विभागाने सांगितले. मागील सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे सदर आकडेवारीवरून दिसून येते.

तालुका गाव संख्या

अंबड ५

बदनापूर ४

भोकरदन ७

जाफराबाद २

जालना १०

मंठा ४

परतूर ३

============

एकूण ३५

=========

जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ३५ गावांत कोरोना रुग्णसंख्या असल्याने तेथील शाळा सुरु करण्यात येऊ नयेत, असे सांगितले आहे.

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, जालना

loading image
go to top