
या मोहिमेसाठी ग्रामीण भागात १६४ बुध शहरी भागात ८५ बुध असतील. प्रत्येक युनीटवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
उदगीर(लातूर): पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी (ता.३१) जानेवारी शहर व ग्रामीण भागातील छत्तीस हजार चारशे एक बालकांना पोलीओ डोस देण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाचे आहे. त्या दृष्टीने पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उदगीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सकाळशी बोलताना दिली.
मोहिमेची सुरुवात रविवारी सकाळी आठ वाजता होणार असून तालुक्यातील देवर्जन, हंडरगुळी, नळगीर, हेर, वाढवणा (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २२ हजार १०१ बालकांना तर शहरातील १४ हजार ३०० बालकांना पोलिओ डोस देण्याचे उदिष्टे आहे.
हिंगोली तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण झाले जाहीर
या मोहिमेसाठी ग्रामीण भागात १६४ बुध शहरी भागात ८५ बुध असतील. प्रत्येक युनीटवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय ६४९ कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरात ६ ग्रामिण भागासाठी ८ मोबाइल टीम तयार करण्यात आल्या आहेत.
शरातील रेल्वेस्टेशन, बसस्थानक, चेक पोष्ट सुविधा असणार आहे. बुथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही? याची खात्री केली जाणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही त्यांना घरी हा डोस दिला जाणार आहे.
Crime News: किरकोळ कारणावरून उदगीरात एकाचा खून
या मोहिमेसाठी नगरपालिका, वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वैद्यकिय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आदींचे सहकार्य मिळणार आहे. या मोहिमेस सहकार्य करावे. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे आवाहन डॉ. कापसे यांनी केले आहे.
(edited by- pramod sarawale)