esakal | हिंगोलीत दसऱ्याला चार फुट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे होणार दहन | Hingoli Dasara Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Ravan Dahan

हिंगोलीत दसऱ्याला चार फुट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे होणार दहन

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली येथील दसरा महोत्सवात या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने होत असुन शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी मोजक्याच मंडळाच्या उपस्थितीत रावण दहन होणार आहे. रावणाची प्रतिकृती उभारण्याचे काम (Hingoli) अंतिम टप्प्यात आले आहे. हिंगोलीचा दसरा म्हैसुरच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे महोत्सव आहे. येथील रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी असते. दसऱ्याच्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते. यावेळी आकर्षक (Dasara Festival) विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र मागच्या वर्षी पासून करोनामुळे दसरा महोत्सवावर बंधने आली आहेत. यामुळे साधेपणाने कार्यक्रम होत आहेत. येथे दरवर्षी ५१ ते ५५ फुट उंच रावण तयार करण्यात येतो.

हेही वाचा: भोंदू बाबाचे पितळ उघड, दैवी प्रकोपाची भीती दाखवून लाटले २३ लाख

शहरातील बाबुलाल बमरुले व त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून रावणाची प्रतिकृती उभारण्याचे काम करतात. मागच्या वर्षीपासून रावणाची उंची कमी करण्यात आली असुन केवळ चार फुट उंच रावण तयार केला केला जात आहे. या वर्षी देखील चार फुट उंच रावण तयार करण्यात आला आहे. काही दिवसापासून बमरुले कुटुंब रावण तयार करण्याचे काम करीत आहे. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजता खाकीबाबा मठात मोजक्याच अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रावण दहन कोरोनाचे नियम पाळत होणार असल्याचे खाकीबाबा मठाचे महंत कमलदास महाराज व रामलिला प्रचारक रामकुमार पांडे यांनी सांगितले.

loading image
go to top