esakal | भोंदू बाबाचे पितळ उघड, दैवी प्रकोपाची भीती दाखवून लाटले २३ लाख | Nanded News
sakal

बोलून बातमी शोधा

Superstition

भोंदू बाबाचे पितळ उघड, दैवी प्रकोपाची भीती दाखवून लाटले २३ लाख

sakal_logo
By
साजीद खान

माहूर (जि.नांदेड) : महाराष्ट्रासह देशभरात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूर (Mahur Gad) येथे अनेक बाबांनी आपला अनधिकृत डेरा जमविला आहे. यातीलच एका भोंदू बाबाने आयुर्वेदिक तिलस्मी उपचाराच्या नावाने एक रुग्णाच्या मजबुरीचा फायदा घेत दैवी शक्ती आपल्याला प्राप्त असल्याचे भासवून वेळोवेळी विविध कारणे देऊन तब्बल २३ लक्ष १४ हजार ५४९ रुपयांनी गंडवून फसवणूक केल्याची तक्रार पीडित व्यक्तीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे (Andashraddha Nirmulan Samiti) केली. समितीने भोंदू बाबाचा भांडाफोड केला असून बुधवारी (ता.१३) रात्री उशिरा गुन्हा दाखल होऊन आरोपीला पकडण्यासाठी पथक (Nanded) रवाना झाले आहे. माहूर (Mahur) येथील स्वतःला दत्तप्रभूंचा अवतार संबोधनाऱ्या विश्वजीत रामचंद्र कपीले हा आयुर्वेदीक व अघोरी उपचार करत असून त्याला अलौकिक शक्ती प्राप्त आहे व तो अनेक रोगांवर उपचार करतो, अशी माहिती मित्राकडून प्राप्त झाली. त्यातून कपिले बाबा यांची ओळख होऊन बाबाच्या होम हवन व इतर विधितून असलेला असाध्य आजार बरा होईल म्हणून तक्रारदार प्रवीण निवृत्ती शेरेकर (रा.कोपरगाव, जि.ठाणे) हा कपिले बाबा यांनी टाकलेल्या जाळेत अलगद अडकला.

हेही वाचा: 'दहा हजारांची मदत तोकडी,सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टाच'

उपचाराच्या नावावर अंधश्रद्धेचा वापर करून डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०२० या दरम्यानच्या काळात भोंदू बाबा विश्वजीत कपिले व त्यांनी सांगितलेल्या बँक अकाउंट क्रमांकवर तक्रारदार याच्या बँक अकाउंटमधून १६ लक्ष ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्यात आले आहे. तक्रारदाराला विश्वजीत कपिले बाबा यास कुटुंब आहे व नागपुर येथे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल आहे, अशी माहिती मिळाली होती. तक्रारदार व शिष्यांना कपिले बाबा हा शारीरिक व मानसिक छळ करुन फसवणुक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी ता.चार जानेवारी २०२१ रोजी तक्रारदार व उद्धव माने, राहुल आराध्ये असे शिष्य मिळुन कपिले बाबा याच्याकडे दत्तयोग आश्रमामध्ये व त्याच्या कुटुंबियाकडे पुसद येथे गेले असता रवि कपिले, कैलास कपिले, सारिका कपिले यांना आम्हाला का फसविले अशी विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई केली तर आम्ही तुमच्यावर व तुमच्या परिवारावर करणी करुत व पोलीस कारवाईची धमकी दिली. त्यामुळे आम्ही सर्व घाबरुन गेलो व विश्वजीत कपिले व त्याचे कुटुंबियाचे विरुध्द तक्रार दिली नाही.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणुकीची तयारी, प्रभाग रचनेसाठी समिती स्थापन

कासव आणि मांडूळ यांच्यावर गुप्तधन काढण्यासाठी विधी

कपिले बाबा हा स्वतःमध्ये देवीशक्तीचा संचार झालेला आहे. त्याआधारे दत्तयोग आश्रममध्ये येणाऱ्या आयुर्वेदीक व तिलस्मी उपचाराच्या नावाखाली हवन, भूतबाधा काढणे, लक्ष्मीबंधन तोडणे, मटका आकडा सांगणे, पैसे घेऊन शक्तीपात देणे, कासव आणि मांडूळ यांच्यावर गुप्तधन काढण्यासाठी विधी करत असे व गुप्तधन शोधण्यासाठी माहूर किल्ला परिसरात खड्डे खोदले होते. या कामासाठी त्यांचे भाऊ रवि कपिले, कैलास कपिले त्यांना मदत करत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कासव आणि मांडूळ यांच्यावर गुप्तधन काढण्यासाठी विधी

कपिले बाबा हा स्वतःमध्ये देवीशक्तीचा संचार झालेला आहे. त्याआधारे दत्तयोग आश्रममध्ये येणाऱ्या आयुर्वेदीक व तिलस्मी उपचाराच्या नावाखाली हवन, भूतबाधा काढणे, लक्ष्मीबंधन तोडणे, मटका आकडा सांगणे, पैसे घेऊन शक्तीपात देणे, कासव आणि मांडूळ यांच्यावर गुप्तधन काढण्यासाठी विधी करत असे व गुप्तधन शोधण्यासाठी माहूर किल्ला परिसरात खड्डे खोदले होते. या कामासाठी त्यांचे भाऊ रवि कपिले, कैलास कपिले त्यांना मदत करत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

loading image
go to top