Video : शालेय मुलीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना फाशी झालीच पाहिजे

विठ्ठल चंदनकर
सोमवार, 20 जानेवारी 2020

साईबाबा विद्यालयातील चार शिक्षक व एका महिलेविरुद्ध रामतीर्थ पोलिसांत १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवस उलटूनही आरोपींना अटक नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. 

बिलोली (जि.नांदेड) :  शंकरनगर (ता.बिलोली) येथील एका विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी सामुहिक बलात्कार केला. त्याप्रकरणी सोमवारी (ता.२० जानेवारी २०२०) सर्व बहूजन समाजातील नागरिक व संघटनांनी आंदोलन करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

बाजारपेठ शंभर टक्के बंद
शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयात सहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी सामुहिक बलात्कार केला. शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी ही घटना असून, पिडीत मुलगी शासकीय दवाखान्यामध्ये मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान साईबाबा विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरही आंदोलकांनी जोरदारी घोषणाबाजी केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शंकरनगर बाजारपेठ सोमवारी शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती.   

हे वाचा सहावीच्या मुलीवर शिक्षकांचा सामुहीक बलात्कार

नागरिक झाले संतप्त
साईबाबा विद्यालयातील चार शिक्षक व एका महिलेविरुद्ध रामतीर्थ पोलिसांत १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवस उलटूनही आरोपींना अटक नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. रामतीर्थ पोलिसानी लवकरात लवकर आरोपींना अटक केली नाहीतर, तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.  

यांचा आंदोलनात सहभाग
या अंदोलनात माधव जमदाडे, प्रा रामचंद्र भरांडे, राहुल प्रधान, जितेश अंतापुरकर, चंद्रप्रकाश देगलुरकर, गंगाधर गंगासगरे, नागसेन कांबळे, अतुल बेळीकर, बाळु जाधव, भास्कर भेदेकर, बाबाराव पाटील रोकडे, श्रीमती पांचाळ, गंगाधर कांबळे, धम्मा भेदेकर, सुनील कांबळे, रावसाहेब बनसोडे, दिपक कांबळे, संतोष पाटील भक्तापुरे, धम्मा गावंडे, पिराजी भालेराव, दत्ता पाटील पुय्यड, संतोष पाटील पुय्यड, हनमंत वाघमारे, गुंडूपंत वाघमारे, शिवाजी दावलेवार, दिंगाबर सोंडारे, दिलीप सोंडारे, चंद्रकांत सोनंकाबळे, अंकूश वाघमारे, ब्रम्हानंद काबंळे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या. 

हेही वाचाच चालुक्यकालिन इतिहासाच्या स्मृती जागविण्याची गरज ः कशासाठी ते वाचलेच पाहिजे

संघटनांचाही पुढाकार
शंकरनगरातील आंदोलनात लोकस्वराज्य आंदोलन, बहूवंचीत आघाडी, युवा पॅंथर, विद्यार्थी युवा संघटना, अखिल भारतीय गुरु संस्था परीषद, भारतीय लोकसेना, रिपब्लिकन सेना, टायगर सेना यांचा सहभाग होता. दरम्यान संघटनांनी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांना निषेधाचे आणि आरोपींवर लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याचे निवेदन दिले.  

 

पिडीत मुलीची वद्यकीय तपासनी झाली असुन दोन दिवसात रिपोर्ट येईल. या घटनेतील आरोपीचा शोध सुरु असून, लकरात लवकर अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- शिध्देश्वर धूमाळ, पोलिस उप विभागीय अधिकारी  बिलोली 
 
शालेय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात यात दोन शिक्षक व मुख्याध्यापक, प्राचार्य, खिचडी शिजवणारी महिला असे पाच आरोपींचा समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे. - दत्तराम राठोड, अप्पर अधिक्षक अधिकारी नांदेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Those' teachers who raped a school girl must be hanged