विनाकारण फिरणाऱ्यांना मिळणार काठीचा प्रसाद

biloli 2.jpg
biloli 2.jpg
Updated on


बिलोली, (जि. नांदेड) ः नांदेड शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर बिलोली शहरासह तेलंगणा सीमेवर लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून मास्क न घालता विनाकारण फिरणाऱ्या दीडशेपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करून तीस हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तालुका स्तरावरील महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनातील सर्वच यंग ब्रिगेड अधिकाऱ्यांनी हातात दंडे घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे.

नागरिकांना खरेदीसाठी मुभा
नांदेड शहरात रुग्ण आढळतात तहसीलदार विक्रम राजपुत यांनी प्रमुखांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदारांनी तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सत्र सुरू केले आहे. मॉर्निंग वॉकला जाणे किंवा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पाचशे रुपये दंड, डबलसीट किंवा चारचाकी वाहनातून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यास पाचशे रुपये दंड, मास्कचा वापर न करणाऱ्यास दोनशे रुपये दंड, तर प्रशासनाची परवानगी न घेता दुकान चालू ठेवणाऱ्यांविरुद्ध पाचशे रुपये दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सकाळी सात ते बारापर्यंतच नागरिकांना खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे.

उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
तेलंगणातील बोधन निजामबाद या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे सीमावर्ती भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तेलंगणातून येणाऱ्या वाहनांसह माणसांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांचे पथक तसेच सीमावर्ती भागातील समन्वय समितीच्या पुढाकाराने तेलंगणातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. गावपातळीवर ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून सीमावर्ती भागात जनजागृतीही केली जात आहे. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह बिलोली नगरपालिकेतील सर्व कर्मचारी, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना घरातच थांबण्याच्या आवाहन करत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. नगरपालिकेतील अशोक स्वामी, प्रदीप ढिल्लोड, लईक सिद्दिकी, जगन्नाथ मेघमाळे आदी यासाठी जागरूकपणे काम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com