esakal | परभणीत पुरामध्ये हजारो एकरवरील सोयाबीन गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

परभणीत पुरामध्ये हजारो एकरवरील सोयाबीन गेले वाहून

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने 22 जुलै रोजी पालम तालुक्यात पुन्हा एकदा पूर आला आहे. तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्याना धोक्याची पातळी ओलांडून पूर आले आहेत. परिणामी, 14 गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला असून आठवड्याभरातला हा दुसरा पूर आहे. (flood in parbhani)

पालम तालुक्यात 20 जुलैपासून पावसात खंड पडलेला नाही. त्यामुळे पालम तालुक्यात पाणीच पाणी झाले असून सर्व नद्या, ओढे, नाल्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीची पालम तालुक्यातील प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला गुरुवारी पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदी पात्र सोडून जवळपास दोन हेक्‍टर क्षेत्र वरून वाहत आहे. त्याखाली जवळपास 30 ते 35 गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र खालील पिके पाण्याखाली गेली आहेत.

हेही वाचा: लग्नाच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणाचा विधवेवर अत्याचार

गळाटी नदीच्या पुरामुळे सायळा, उमरथडी, खुरलेवाडी, धनेवाडी गावचा संपर्क पालमशी तुटलेला आहे. तर लेंडी नदीच्या पुरामुळे पुयनी, आडगाव, वनभुजवाडी, खडी, तेलजपुर, आरखेड, सोमेश्वर, घोडा, फळा, फरकंडा गावांचा संपर्क पालमशी होऊ शकला नाही.

loading image