esakal | लग्नाच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणाचा विधवेवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

लग्नाच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणाचा विधवेवर अत्याचार

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणाने अत्याचार केला. तसेच तिला तीन लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोन एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०२० याकाळात घडला. श्रीकांत विक्रम इंगोले (रा. सावरगाव, जि. हिंगोली) असे फसवणूक केलेल्या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी वाळूज भागातील रांजणगाव शेणपुंजी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या पतीचे २०१३ मध्ये हृदयविकाराने निधन झालेले आहे. ही महिला एप्रिल २०१५ मध्ये एका कंपनीत कामाला होती. तिथेच तिची इंगोलेसोबत ओळख झाली. या ओळखीतून इंगोले महिलेच्या खानावळीतही जेवणासाठी जाऊ लागला. त्यानंतर त्याने आईवडील अथवा कोणताही नातेवाईक नसल्याचे सांगत महिलेची सहानुभूती मिळवली. एकटा राहत असल्यामुळे मदत कर असे म्हणत पुढे तो महिलेच्याच घरी राहू लागला. याचदरम्यान, महिलेचे आणि त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यातून दोघांचे बऱ्याचदा शारीरिक संबंध देखील झाले.

हेही वाचा: २१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!

महिलेला त्याने यूपीएससीची परीक्षा देत असल्याचे सांगत तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे महिलेने एलआयसी आणि निराधार योजनेतून बँकेत जमा असलेले तीन लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर क्लाससाठी दिल्लीला जात असल्याचे सांगत तो अधूनमधून महिलेच्या घरी भेटायला जायचा. महिला त्याच्याकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्यावर तो तू मला जीवनदान दिल्याचे म्हणत लग्नाचा विषय टाळायचा.

हेही वाचा: विष्णुपुरीच्या साठ्यात सर्वाधिक वाढ, सीना कोळेगाव शून्यावरच

दरम्यान, अशात इंगोले याचे नातेवाइकातील मुलीसोबत लग्न होत असल्याचे इंगोलेचा धाकटा भाऊ सिद्धार्थ याच्याकडून नऊ एप्रिलरोजी समजले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे महिला लग्न रोखण्यासाठी गेली. तेव्हा इंगोलेने येथे तमाशा करू नको, तुझे घेतलेले तीन लाख रुपये परत करतो. असे म्हणत तिला शिवीगाळ केली. त्यामुळे महिला तेथून निघून आली. वारंवार फोन करूनही इंगोले पैसे देत नसल्याचे पाहून महिलेने पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव करत आहेत

loading image