
वसमत : मराठवाडा आणि विदर्भात प्रसिद्ध असलेल्या वसमत तालुक्यातील वाई (गोरक्षनाथ) येथे पोळ्यानंतर होणाऱ्या करीनिमित्त शनिवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून हजारो बैलजोड्या दर्शनासाठी दाखल झाल्या. संध्याकाळी पाचपर्यंत तब्बल ४० हजारांहून अधिक बैलजोड्यांनी गोरखनाथांच्या चरणी माथा टेकवला, तर अनेक बैलमालकांनी इडापिडा टळो म्हणत गोरखनाथांची प्रार्थना केली.