esakal | परभणीत तीन मृत्यू, ८० पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता.सात) उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला तर नव्याने ८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

परभणीत तीन मृत्यू, ८० पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणीः जिल्ह्यात बुधवारी (ता.सात) उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला तर नव्याने ८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. एकूण बाधित संख्या पाच हजार ८७८ झाली तर आतापर्यंत एकूण मृत्यू २४८ इतके झाले आहेत. 

परभणी शहरात एक जण बाधित 
शहर महापालिकेच्या वतीने बुधवारी (ता.सात) शहरातील सात केंद्र, सात खाजगी रुग्णालयात ६४ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ६३ व्यक्ती निगेटिव्ह तर एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. जायकवाडी येथील मनपा रुग्णालयात ११ व्यक्तींची तपासणी केली असता एक व्यक्ती बाधित आढळला. सिटी क्लब येथे सात, शंकर नगरातील मनपा रुग्णालयात दोन, खानापूर मनपा रुग्णालयात एक, इनायत नगर आरोग्य केंद्र तीन, वर्मानगर आरोग्य केंद्र चार, साखला प्लॉट आरोग्य केंद्रात पाच तसेच खासगी रुग्णालयात ३१ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा - परभणी : शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी- संतोष आळसे

सेलूत निघाले दहा कोरोना बाधित 
सेलू ः सेलूत कोरोनाचे पेशंट आटोक्यात आले होते. परंतू, प्रशासनाने लॉकडाउन उठवल्यानंतर शहरात अलीकडच्या काळात नागरिकांची मूख्य ठिकाणी तोबा गर्दी पहावयास मिळत आहे. बुधवारी (ता.सात) शहरातील विद्यानगर परिसरात नऊ व पांडे गल्लीत एक असे एकूण दहा रूग्ण पॉजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली. विद्या नगरातील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय पुरुषाच्या सहवासात आलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वॅब घेतले असता नऊ जण पॉझिटिव्ह आले. यातील दोन कोरोना बाधितांना परभणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पांडे गल्लीतील रहिवासी असलेले ५३ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बुधवारी एकाच दिवशी ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे शहरात चिंतेची बाब निर्माण झाली आहे.  


हेही वाचा - परभणी : हिरव्या भाज्या जेवणातून हद्दपार; भाज्यांच्या किमंती कडाडल्या

परभणीत २७ नागरिकांना दंड 
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणाऱ्यांना २७ नागरिकांना बुधवारी(ता.सात) परभणी शहर महापालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत दोनशे रुपये प्रमाणे दंड लावण्यात आला. तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या दंड लावण्यात येत असून तीन पथकाची स्थापना करण्यात आली. प्रभाग समिती क अंतर्गत २७ व्यक्तींकडून पाच हजार चारशे रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अब्दुल शादाब, नयनरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड,कुणाल भारसाकळे, मकरंद, दत्ता गवाले, अशोक माळगे आदीच्या पथकाने ही कारवाई केली. 

बुधवारी (ता.सात) रात्री साडेसात वाजेपर्यंतची आकडेवारी 


परभणी जिल्हा 
एकूण बाधित : पाच हजार ८७८ 
आजचे बाधित : ८० 
आजचे मृत्यू : तीन 
एकूण बरे झालेले : पाच हजार १९ 
उपचार सुरू असलेले : ६११ 
एकूण मृत्यू : २४८  

 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image