esakal | तीन घरे फोडून दागिने, रोख रक्कम लांबविली
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र

खुलताबाद शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली आहे. या घटना शनिवारी (ता. 24) पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडल्या आहेत. चार ते पाच चोरट्यांनी या चोऱ्या केल्या असण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली.

तीन घरे फोडून दागिने, रोख रक्कम लांबविली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद, ता. 24 ( जि.औरंगाबाद) ः खुलताबाद शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, यात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली आहे. या घटना शनिवारी (ता. 24) पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडल्या आहेत. चार ते पाच चोरट्यांनी या चोऱ्या केल्या असण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली.


मिर्झा मोईन बेग मिर्झा निसार बेग यांच्या घरातील रोख पन्नास हजार रुपये, सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरचे पसार झाले. तसेच मोहम्मद ताहीर मोहम्मद इद्रिस यांच्या घरातील कपाटातून पंधरा हजार रुपये चोरट्यांनी पळविले, कपाट उचकटताना त्यांना पाकीट हाती लागले. त्यात सापडलेल्या चावीने कपाटाचा कप्पा उघडून चोरट्यांनी हात साफ केला. चार ते पाचजण तोंडावर लाल रुमाल बांधून फिरताना नागरिकांनी पाहिले. त्यांच्या पाठलाग केला असता ते अंधारात पसार झाले, असे नागरिकांनी सांगितले.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत.


सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची वेळोवेळी तक्रार देऊनही याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आठ ते दहा ठिकाणी चोरी झाली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

loading image
go to top