इथे होणार म्हाडाची साडेतीनशे घरे...

file photo
file photo

औरंगाबाद : सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे तयार करणाऱ्या म्हाडातर्फे सावंगी-अशरफपूर परिसरातील कबीरमठ परिसरात साडेतीनशे सदनिकांचा प्रकल्प होणार आहे. नवीन वर्षात या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
शहरात ब्रिजवाडी, नक्षत्रवाडी आणि पडेगाव येथे 4 हजार 564 घरांचे प्रकल्प सुरू होणार आहेत. या प्रकल्पांपैकी ब्रिजवाडीच्या आठ हेक्‍टरच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी दिली. 

म्हाडातर्फे घर घेणाऱ्यांसाठी नियमित विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षत्रवाडी येथे पाच एकर जागेवर नवीन प्रकल्प होणार आहे. त्यासह पडेगाव येथेही म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे. यासह आता कबीरमठाजवळ वन बीएच के आणि टू बीएच केचे साडेतीनशे सदनिका तयार होत आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याची माहिती जाहीर केली जाणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प

जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा काम करते. नक्षत्रवाडी येथे 15 हेक्‍टर जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तीन हजार सदनिकांची योजना प्रस्तावित असून डीपीआर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तर ब्रिजवाडी येथे आठ हेक्‍टर शासकीय जमिनीलाही मंजुरी मिळाली आहे. येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दीड हजार सदनिकांचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

सदनिकांसाठी पाणीपुरवठासाठी 2 कोटींचा निधी

यासह पडेगाव येथील 364 सदनिकांसाठी टेंडर काढण्यात आले आहेत.म्हाडातर्फे सातारा, देवळाई आणि तीसगाव येथील सदनिकांची किंमत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी करून ड्रॉ पद्धतीने विक्री करण्यात आली. यात देवळाईच्या सदनिकांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. यातील 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीला देण्यात आले आहेत. याचे टेंडर काढले आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. 

इतर जिल्ह्यांतही प्रकल्प 
जालना येथील गट क्रमांक 488 वरील शिल्लक क्षेत्रावर घरकुलाची योजना असून 280 सदनिका असणार आहेत. हिंगोली येथे 180 घरांच्या प्रकल्पाची बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. यासह पुढील वर्षभरात चिकलठाणा, वळदगाव, देवळाई, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, लातूर, तुळजापूर, माहूर आदी ठिकाणी मिळून विविध घटकांसाठी 15 हजार घरे उभारण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात 25 हजार सदनिका तयार होणार आहेत

मराठवाड्यात सुरू असलेले प्रकल्प 

औरंगाबाद 4564 
जालना 280
हिंगोली- 132
अंबाजोगाई- 400 
उस्मानाबाद- 150 
लातूर- 400
एकूण 5,926 सदनिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com