esakal | ‘कोन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

`कोन बनेगा करोडपती`मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बुधवारी (ता. १८) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कोन बनेगा करोडपती’मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक, उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : `कोन बनेगा करोडपती`मधून बोलत असल्याचे सांगत साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून बुधवारी (ता. १८) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. `कोन बनेगा करोडपती` मधून मी राणाप्रताप सिंह कोलकत्ता येथून बोलत आहे. तुम्हाला चारचाकी गाडी व २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी खाते उघडण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर रक्कम जमा करावी लागेल. अशा प्रकारचा फोन चिलवडी (ता. उस्मानाबाद) येथील नीता अशोक डिसले यांना येत होता.

१५ जूनपासून त्यांना अशा प्रकारचा फोन येत होता. त्यावर विश्वास ठेवून श्रीमती डिसले आणि त्यांचा मुलगा रामराजे याने संबंधिताने दिलेल्या एसबीआय बँकेच्या वेगवेगळ्या १२ बँक खात्यावर पैसे भरले. सुमारे तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्यांनी भरली. त्यानंतरही श्रीमती डिसले यांना संबंधीत व्यक्तीने पुन्हा फोन करून दीड लाख रुपये भरल्यानंतर २५ लाख रुपये व गाडी घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर डिसले यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. निती डिसले यांनी बुधवारी (ता.१८) दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image