esakal | बिडकीन येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बिडकीन येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

बिडकीन (ता. पैठण) येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 24) घडली. दरम्यान, वेळेवर योग्य तो उपचार न मिळाल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.

बिडकीन येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिडकीन (जि.औरंगाबाद) ः बिडकीन (ता. पैठण) येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 24) घडली. दरम्यान, वेळेवर योग्य तो उपचार न मिळाल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे. बिडकीन येथील बागवान गल्लीमध्ये राहणारे कलीम सय्यद यांची तीन महिन्यांची मुलगी माहेरा हिला शनिवारी  सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांनी खासगी दवाखान्यात दाखल केले असता येथील डॉक्‍टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

त्याप्रमाणे सय्यद कलीम व त्यांची पत्नी यांनी माहेरा हिला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेबाबात मुलीचे वडील सय्यद कलीम यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी वेळीच उपचार न मिळाल्यानेच आमच्या बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत उपस्थित वैद्यकीय अधिकारी संजय गोरे यांना घेराव घातला. यावेळी पंचायत समिती सदस्य लतीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य सय्यद फेरोज, सय्यद नसीर, अख्तर शेख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला.

या घटनेमुळे नातेवाइकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी संजय गोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तिला ग्रामीण रुग्णालयात आणले असता ती मृतावस्थेत होती. तिला तपासून मृत घोषित करण्यात आले.

loading image
go to top