उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह

file photo
file photo
Updated on

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. यात कळंब तालुक्यातील हावरगावातील दोन, तर भूम तालुक्यातील एकाचा समावेश आहे. भूम तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. शनिवारी (ता. १६) रात्री त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकूण सात झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी एका रुग्णास सोलापूरला हलविण्यात आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील १६८, तुळजापूर १४५, उमरगा २०६, लोहारा ५२, कळंब १४५, वाशी ११, भूम १९, तर परंडा तालुक्यातील ५३ जणांचा समावेश आहे. त्यापैकी ७४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित अहवाल अद्याप मिळाले नाहीत. एप्रिलच्या सुरवातीला उमरगा तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते. ते उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

त्यानंतर तब्बल ३८ दिवसांनंतर सोमवारी (ता. ११) परंडा तालुक्यातील एका युवकाला कोरोनाची बाधा झाली. तर गुरुवारी (ता. १४) कळंब तालुक्यातील तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज कळंब तालुक्यातील हावरगावातील दोघांसह भूम तालुकातील पन्हाळवाडीच्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकूण सात झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कळंबच्या एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास सोलापूर येथे शुक्रवारी (ता. १५) हलविण्यात आले आहे. दरम्यान, आज आढळलेले तीनही रुग्ण मुंबईहून परतल्याची माहिती आहे. 

परजिल्हयातून आलेल्या नागरिकांची तत्काळ आरोग्य तपासणी करुन त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात किंवा तात्पुरत्या स्वरुपात आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करुन स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जात आहे. स्वॅब अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी संयुक्तपणे घेत कार्यवाही करीत आहेत. दरम्यान, गाव पातळीवर स्थानिक नागरिकांनी परजिल्हयातून आलेल्या नागरिकांची अडवणूक करु नये, त्यांना सेवा सुविधा न देणे असे प्रकार होणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी असे प्रशासनाने सूचित केले आहे.

होम किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करताना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षातील व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे वा इतर कोणतेही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोरोना सहाय्यता कक्षात हलविले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com