Beed News : आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचे लोण बीडपर्यंत,तिघांना अटक

आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील घोटाळा गाजत असून गट ड परीक्षेचा पेपर फुटल्याचेही समोर आले आहे.
paper leak case
paper leak caseesakal
Updated on

बीड : आरोग्य विभागातील (Health Department) भरती परीक्षेतील घोटाळा गाजत असून गट ड परीक्षेचा पेपर फुटल्याचेही (Paper Leak) समोर आले आहे. पेपरफुटी प्रकरणाचे लोण बीड जिल्ह्यातही पोचले आहे. पुणे येथील सायबर पोलिसांनी अटक केलेल्या ११ आरोपींमध्ये बीड जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य विभागातील एक शिपायासह एका शिक्षकाचे आरोपींमध्ये समावेश आहे. ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागात गट ड पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा झाली. परीक्षा पूर्वीपासून परीक्षा केंद्र, प्रवेशपत्रावरील चुका अशा तक्रारी सुरु होत्या. तर, परीक्षा झाल्यानंतर पेपर फुटल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता. सदर परीक्षा भलतीच वादात सापडली होती. दरम्यान, या प्रकरणी काही दिवसांपूर्वी पुणे येथील सायबर पोलिसांनी पेपरफुटीचा (Beed) गुन्हा नोंद केला. दरम्यान, या प्रकरणात मंगळवारी (ता. सात) लातूर येथील आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी अटक झाल्यानंतर या पेपरफुटीचे लोण बीड जिल्ह्यात पोचल्याचे समोर आले.

paper leak case
Beed : कर्तव्यावर असताना जवान अविनाश आंधळे यांचे हृदयविकाराने निधन

मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेच्या साखळीत लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप त्रिंबक जोगदंड, नेकनूर येथील स्त्री रुग्णालयातील शिपाई शाम महादू मस्के तिंतरवणी (ता. शिरुर कासार) येथील जिल्हा परिषद शिक्षक उद्धव प्रल्हाद नागरगोजे यांची नावे समोर आली आहेत. यात बीड जिल्ह्यातीलच आणखी एक रहिवाशी व सध्या भूम (जि.उस्मानाबाद) ग्रामीण रुग्णालयात सहायक अधीक्षक पदावर असलेला राजेंद्र पांडूरंग सानप याचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ जिल्ह्यातही पेपरफुटीचे लोण पोचल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com