अर्धापूर, जि. नांदेड - अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एकाने मजुरी बरोबर मिळत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. तर दाभड शिवारातील कालव्यात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. या तिन्ही घटनेबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विहीरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू
या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , सर्जेराव शंकरराव कांबळे (वय-५१) हे सालगडी म्हणून डौर (ता. अर्धापूर) शिवारातील डॉ मनोजकुमार राठोड यांच्या शेतात राहतात. ते विहीरीजवळ बसले आसता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. तीन) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाली.या प्रकरणी रावसाहेब सर्जेराव कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मजुरीचे काम बरोबर मिळत नाही म्हणून आत्महत्या
या घटनेची पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की संभाजी बाबाराव ढगे (वय-१९, रा. निजामपूर, ता. अर्धापूर) हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करीत असत. ते मजुरीचे काम बरोबर मिळत नाहीत म्हणून विवंचनेत होते. त्यांनी या विवंचनेत असताना आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन सोमवारी (ता. तीन) रात्री साडे सात वाजण्याच्यापुर्वी आत्महत्या केली. या प्रकरणी नागोराव सदाशिव ढगे यांनी दिलेल्या माहितीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दाभड शिवारातील कालव्यात अनोळखी महिलेचे प्रेत आढळले
या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाभड शिवारातील सत्यगणती देवस्थानाच्या परिसारातुन जाणाऱ्या कालव्यात एका सुमारे पंचावन्न ते साठ वयाच्या एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (ता. चार) दुपारी आढळून आला.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कराळे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.