बीड : कपिलधार घाटात जीप दरीत कोसळून तीन ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

हरिष कांबळे, सचिन सुरवसे, संतोष काळे व धर्मराज वीर हे चार तरुण शनिवारी स्कॉर्पिओ जीपमधून मांजरसुंबाहून कपिलधारकडे जात होते. मांजरसुंबा ते कपिलधार हा घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व जीप दरीत कोसळली.

बीड : चालकांचे नियंत्रण सुटल्याने, जीप पाचशे फुट दरीत कोसळून झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. दोन) सायंकाळी परिसरातील कपिधार घाटात घडली. हरिष कांबळे (वय ३०), सचिन उत्‍तमराव सुरवसे (वय ३५) व संतोष महादेव काळे (वय ३५) (तिघेही रा. शाहुनगर, बीड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. 

शहरातील हरिष कांबळे, सचिन सुरवसे, संतोष काळे व धर्मराज वीर हे चार तरुण शनिवारी स्कॉर्पिओ जीपमधून मांजरसुंबाहून कपिलधारकडे जात होते. मांजरसुंबा ते कपिलधार हा घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व जीप दरीत कोसळली. यात हरिष कांबळे हा तरुण जागीच ठार झाला. तर सचिन सुरवसे व संतोष काळे यांना उपचारासाठी बीडमध्ये आणल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, कपिलधारला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी या चौघांना बाहेर काढून उपचाराला दाखल करण्यासाठी मदत केली. स्थानिक पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.अपघाताची माहिती मयताचे कुटूंबिय व नातेवाईंकाना झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three people died in accident at Beed

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: