Drowning Accident: मराठवाड्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी तलावात बुडून तीन जणांचा मृत्यू
drowning accident: गंगापूर तालुक्यातील तळेसामान आसेगाव येथील तलावात तरुण विशाल मच्छिंद्र माळे (२६) बुडून मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी येथील तलावात मासे पकडताना दोघांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील तळेसामान आसेगाव येथील तलावात बुधवारी (ता. ८) दुपारी विशाल मच्छिंद्र माळे (वय २६, रा. आसेगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.