esakal | अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तीन वर्षे कारावास
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तीन वर्षे कारावास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : विहिरीवर (Beed) पाणी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी गुरुवारी (ता. २२) ठोठावली. शिरूर तालुक्यात अडीच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. प्रकाश मारुती सानप (वय २१) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील (Shirur) एका गावात अल्पवयीन मुलगी १९ डिसेंबर २०१८ रोजी विहिरीवर पाणी आणण्यास गेली होती. पाणी शेंदत असताना प्रकाश मारुती सानप (वय २१) याने पाठीमागून येऊन तिची छेड काढली होती. पीडितेच्या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन उपनिरीक्षक एम.आर.काझी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.(three years jailed to accussed for misbehave with minor girl in beed glp 88)

हेही वाचा: लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या न्यायालयात खटला चालला. न्यायाधीश श्री. महाजन यांनी प्रकाश सानप यास दोषी ठरवले. त्याला तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. व्ही. सुलाखे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक सी. एस. इंगळे यांनी त्यांना साहाय्य केले.

loading image