पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक करून धारूर येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे.
किल्लेधारूर (बीड) : धारूर येथील गणेश नडगिरे हे (ता. १९) फेब्रुवारी रोजी संध्याकाळी धारूर - तेलगाव रोडवरील (Dharur Telgaon Road) श्रावणी पॅलेसच्या जवळ रस्त्याने मोटरसायकलवर जात असताना अचानक तीन जणांनी येऊन तलवारीने वार करून जखमी केले. त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश आले.