Tik Tok कलाकारांचा बीड जिल्ह्यात राज्यस्तरीय मेळावा, आजीबाईही..

पांडुरंग उगले 
मंगळवार, 21 जानेवारी 2020

बीड जिल्ह्यातील पात्रुड (ता. माजलगाव) येथे येथे टिकटॉक कलाकारांचा मेळावा झाला. या वेळी हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावत कलावंतांसोबत सेल्फी घेत बनवले व्हिडीओ बनविले. 

माजलगाव (जि. बीड) -चाहत्यांचा गराडा, ऑटोग्राफ, सेल्फी काढण्यासाठी गर्दी, सोबत व्हिडिओ बनवण्यासाठीची धडपड हे चित्र पूर्वी एखाद्या चित्रपटातील नायक, नायिकेसोबतच पाहायला मिळत होते; परंतु माजलगावच्या मेळाव्यात आपण सेलिब्रेटी झाल्याचा अनुभव टिकटॉक कलाकारांना आला. निमित्त होते पात्रुडच्या दीपक घुबडे या कलाकाराने रविवारी (ता. 19) आयोजित केलेल्या राज्यभरातील टिकटॉक कलाकारांच्या मेळाव्याचे...! 

अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मोबाईलमधील टिकटॉक ऍप्लिकेशनमुळे ग्रामीण भागातील झोपडीपासून शेतावरच्या बांधावरचा कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पूर्वी स्वतःतील कलागुण दाखविण्यासाठी नाटक, चित्रपटात काम मिळवण्यासाठी मुंबईसारख्या मायानगरीत संपूर्ण आयुष्य घालूनही सर्वसामान्य कलाकारांना संधी मिळत नव्हती. ती किमया आता हातातल्या मोबाईलमधील टिकटॉक ऍप्लिकेशनमुळे घरबसल्या पूर्ण केली आहे.

हेही वाचा - वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

अल्पवधीत लोकप्रिय झालेल्या या ऍप्लिकेशनने ग्रामीण भागातील झोपडी राहणाऱ्या तरुणांपासून शेताच्या बांधावर काम करणाऱ्या मजुरांना रातोरात स्टार केले अन्‌ अनेक टिकटॉक कलाकारांचे टॅलेंट जगासमोर आले. असाच एक पात्रुड (ता. माजलगाव) येथील दीपक घुबडे या कलाकाराने टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला सुरवात केली अन्‌ पाहता पाहता त्याच्या चाहते, फॉलोअर्सची संख्या लाखाच्या घरात गेली. टिकटॉक कलाकारांना मोठा चाहता वर्ग आहे, त्यांना पाहण्याची सर्वांना आवड असल्याचे लक्षात घेऊन रविवारी (ता. 19) पात्रुडमध्ये टिकटॉक कलाकारांचा राज्यव्यापी मेळावा झाला.

हेही वाचा - राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

मुंबई, पुणे, नांदेड, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणीसह राज्यभरातील कलाकार एकत्रित आले. त्यांना पाहण्यासाठी जिल्हाभरातून हजारो चाहते माजलगावात आले. एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे शेकडो चाहत्यांचा गराडा कलाकारांभोवती पडला होता. जो तो सेल्फी, व्हिडिओ काढण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून चित्रपटाप्रमाणे आपण सेलिब्रेटी झाल्याचा अनुभव त्यांना आला. मेळाव्यात सर्वांनी धम्माल करत चाहत्यांच्या मागणीला प्रतिसाद देत स्वतःचे अनुभव मांडून नवीन कलाकारांना प्रोत्साहन दिले. 

स्वतःतील कलागुण जगासमोर आणण्यासाठी ग्रामीण भागातील कलाकारांना टिकटॉक हे मोठे माध्यम आहे. जग नावे ठेवील याचा विचार न करता कलाकारांनी 
या संधीचे सोने करावे. 
-दीपक घुबडे, आयोजक, टिकटॉक कलाकार  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tik Tok artists' state-level gathering in Beed district