esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात आज २३७ जणांना कोरोनाची लागण, सहा रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3corona_1180

उस्मानाबाद जिल्ह्यात आज शनिवारी (ता.२६) कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात आज २३७ जणांना कोरोनाची लागण, सहा रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.२६) २३७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. एकाच दिवसात साडेतीनशे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यामध्ये मृत्युदर २.९८ टक्के इतका वाढला असुन रुग्ण बरे होण्याचा दर ७६.५८ इतका झाला आहे. उमरगा तालुक्यातील आलुर येथील ७१ वर्षीय स्त्रीचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच सावरगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. नितळी येथील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. वाशी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. कळंब शहरातील मोमीन गल्ली यथील ७३ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. या सहा मृत्युने आकडा ३४१ वर पोचला आहे. परजिल्ह्यामध्ये मृत्यु झालेले मृत्यू मागील काही दिवसांमध्ये झाले असुन त्याची नोंद आता पोर्टलवर करण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या महिला रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, रुग्णांना करावी लागते शोधाशोध


२३७ रुग्णांपैकी ९३ आरटीपीसीआरद्वारे, तर १३४ रुग्णांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दहा रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये ६१ रुग्णांची वाढ झाली असून त्यामध्ये १५ आरटीपीसीआरद्वारे, तर ४४ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन दोन जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत.

कळंबमध्ये ४७ रुग्ण वाढल्याचे दिसुन येत आहे. त्यात आठ जण आरटीपीसीआरद्वारे व ३८ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एक जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाली आहे. वाशीमध्ये ३९ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये २४ जण आरटीपीसीआरद्वारे व १५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा येथे ३१ जण बाधित झाले असुन त्यामध्ये २४ जण आरटीपीसीआरद्वारे व सहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुळजापुर १३ , लोहारा १२ , परंडा १९, भुम १५ अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top